कामगारमंत्री खाडे यांच्या कार्यकाळात जाहिरातबाजीवर 113 कोटीची उधळपट्टी : डाॅ.महेशकुमार कांबळे
माहिती अधिकारातून माहिती उघड; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार
मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र सरकारचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कामगार खात्याकडून वर्षभरात प्रचार प्रसिद्धीवर कोट्यवधींची उधळपट्टी झाली. कामगार खात्याच्या कामगार मंडळाने या 1 वर्षात फक्त प्रचार प्रसिध्दीसाठी 113 कोटींचा खर्च केले आहे. हा सारा प्रकार मिरजेचे एमआयएम नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत ही पुढे आले आहे. आज पत्रकार परिषद दरम्यान कांबळेनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, कामगारमंत्री सुरेश खाडे अध्यक्ष असणाऱ्या कामगार कल्याण मंडळाकडून वर्षभरात अनेक खासगी कंपन्यांना कोट्यवधीची प्रसिद्धीची कामे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही सरळसरळ कामगार योजना प्रसिद्धीच्या नावाखाली 113 कोटींची उधळपट्टी झाली आहे. माहिती अधिकारातून उघडकीस आलेल्या कामगार खात्याच्या प्रसिद्धीच्या 113 कोटींच्या खर्चाच्या चौकशीसाठी आणि या उधळपट्टी विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे देखील ते म्हणाले.