मराठा समाज जागृतीसाठी तीन लाख पुस्तिका घरोघरी पोहोचविणार – वसंतराव मुळीक

      मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज असून त्यासाठीची जनजागृती मोहीम हाती धेतली आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या वाटा, स्मार्ट फोन, सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी शासकीय आणि खाजगी 125 शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता यांचा या पुस्तिकेत समावेश आहे.

       अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कॉढरे यांच्या संकल्पनेतून या पुस्तिकेच्या माध्यमातून समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीचे उपक्रम असून महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद घरोघर संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींचा संदेश तसेच विविध प्रकारची माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

      यामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद भौरे, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ डॉ. अरुण अडसुळ, ज्येष्ठ विधिज्ञ मा, उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था मा, बाबा भांड, अध्यक्ष बीव्हीजी ग्रुपचे  हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष सह्याद्री फार्म नाशिक मा. विलास शिंदे, चेअरमन मगरपट्टा सिटी पुणे मा. सतीष मगर, अध्यक्ष ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियान मा. संजय यादवराव, इतिहास संशोधक मा. इंद्रजीद सावंत, संवाद कौशल्य, वकृत्व कला प्रशिक्षक मा. शशांक मोहिते इ. मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरुन दिले असल्याचेही वसंतराव मुळीक यांनी सांगितले, यावेळी  डॉ. संदिप पाटील, प्रकाश पाटील, मारुती मोरे,उदय देप्ताई, शैलजा भोसले आणि चंद्रकांत चव्हाण आदिजण उपस्थित होते.

About The Author