वारकरी बांधवांच्या सेवेचे सुख अनोखे- दिग्विजय चव्हाण
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज मध्ये महाराष्ट्राची अखंड परंपरा असणारी पायी दिंडीचे आगमन झाले. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणारी, वारकऱ्यांचा श्वास असणारी, ध्यास असणारी विठू माऊलीच्या आषाढी एकादशीसाठी निघालेली वारकऱ्यांची पायी दिंडी आज न्यू इंग्लिश स्कूल मिरजेच्या भव्य प्रांगणामध्ये विसावली.
दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजच्या मैदानामध्ये श्री महादेव भक्त वारकरी पायी दिंडी सोहळा भजनी मंडळ पाडळी खुर्द ता.करवीर जि. कोल्हापूर व वै श्री. सद्गुरु ह. भ. प. तात्यासो वासकर महाराज कोल्हापूर वारकरी संप्रदाय प्रणित श्री उत्तरेश्वर विठ्ठल मंदिर उत्तरेश्वर कोल्हापूर यांच्या पायी दिंडीचे आगमन झाले. सर्व वारकरी भक्तामार्फत भजन ,कीर्तन व चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास वारकऱ्यांच्या सेवेसाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. या दिंडीच्या स्वागतासाठी शाळेतील संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी तयारी केली होती. दिंडीचे आगमन होताच वारकरी संप्रदायाची ओळख असणाऱ्या विनेचे पूजन मा. श्री दिग्विजय मोहन चव्हाण प्रशासकीय अधिकारी यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर छोट्याशा कीर्तनानंतर आलेल्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिंडीतील कीर्तनामुळे व प्रवचनामुळे शाळेतील वातावरण अगदी वारकरीमय झाले होते. विठुरायाची पंढरपुरीच इथे विसावल्यासारखी वाटत होती. या महाप्रसादाच्या वाटपामध्ये शाळेतील प्रत्येक जण मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करीत होते. सह दिंडीच्या स्वागतासाठी व सेवादानासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरजचे सर्व पदाधिकारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी दोन्हीही दिंडी आपल्या पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाल्या. सदर कार्यक्रमासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे मा.अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण, खजिनदार श्रीमती राजश्री चव्हाण, सदस्य प्रकाश जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय चव्हाण, गजानन चव्हाण, आदित्य चव्हाण आदी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण माने, उप मुख्याध्यापक उत्तम पाटील, पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, डॉ परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, डॉ व्हावल, डॉ चिडगुपकर, डॉ विकास पाटील, बाबासाहेब आळतेकर अतिश अग्रवाल , प्रभात हेटकाळे,विशाल निप्पानीपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.