अतिवृष्टीमुळे रांगणा किल्ला व सवतकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद
गारगोटी (प्रतिनिधी) :- भुदरगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने रांगणा किल्ला व सवत कडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
भुदरगड तालुकका हा सह्याद्रीच्या कुशीत असल्याने या तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते,यंदाही प्रसिद्ध अशा रांगणा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे,शिवाय गेल्या दोन वर्षापूर्वी कांही पर्यटक पावसाळ्यात ओढ्यातील पाण्यामुळे अडकून पडले होते,त्यामुळे धोका टाळण्यासाठी व खबरदारी म्हणून वन खात्याने रांगणा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला आहे. तसे फलक लावण्यात आले आहेत. भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील दोनवडे, ,तोरस्करवाडी,तमाशाचा खडक,फये येथील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत, गेल्या वर्षी कांही धबधबे पाहण्यासाठी आलेल्या हौशी पर्यटकांना दुर्घटना घडल्याने शिवाय यंदाही जिल्ह्यात व राज्यभर धबधब्याच्या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत.त्यामुळे सावधगिरी बाळगली जात आहे. यावर्षी प्रसिद्ध अशा सवतकडा धबधबा रस्त्यावर डोंगर खचला आहे,त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वनखात्याने सवत कडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला,तसा फलकच वन खात्याच्या वतीने लावण्यात आला आहे.