मनपा प्रशासन व ठेकेदार यांच्यात ताळमेळ नसल्याने शंभर फुटी रोडला पडला खड्डा- ॲड. स्वाती शिंदे
भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केले खड्ड्यात उतरून आंदोलन
सांगली (प्रतिनिधी)
सांगली येथील राजर्षी शाहू महाराज मार्ग (१०० फुटी) रस्त्यावर ५-६ दिवसापूर्वी मोठे भगदाड पडलेले आहे. गेली सहा दिवस पडलेले हे भगदाडाचे काम जैसे थे आहे. त्या ठिकाणी बॅरॅकेट लावून रस्ता अडवल्यामुळे अर्ध्याहून जास्त रस्ता बंद झाला आहे. १०० फुटी रस्त्यावर ड्रेनेज मुळे पडलेल्या मोठ्या भगदाडचे काम त्वरित सुरू करा याकरिता भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले.
सांगली कित्येक वर्ष हा रस्ता अत्यंत खराब होता. जाण्या येण्यास योग्य नव्हता परंतु आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने या रस्त्याला कोट्यावधी रुपये निधी देऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता झाला देखील, हा रस्ता झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु अचानक हा मोठा खड्डा त्या ठिकाणी पडला. या अगोदर डी मार्ट जवळ देखील असाच प्रकार झाला होता. एकंदरीत बघता ड्रेनेजचे कारण पुढे येत आहे. या वेळेला ह्या रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲड. स्वाती शिंदे यांनी मनपाच्या ड्रेनेज विभागाच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. त्याचबरोबर त्या ठिकाणी महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. कुरणे घटनास्थळी आले.
यावेळी बोलताना ॲड.स्वाती शिंदे म्हणाल्या की, महापालिका व कंत्राटदार यांच्यात कोणताही ताळमेळ नाही. खर्च करत असताना त्या रस्त्याखालचे ड्रेनेज लाईन खराब आहे व जुनी आहे हे त्यावेळी प्रशासनाला कळले नाही का? महापालिका क्षेत्रामध्ये इतका मोठा कोट्यावधी रुपयाचा रस्ता होत असताना या साऱ्या गोष्टी का लक्षात घेतल्या नाहीत? याला जबाबदार कोण? असा सवाल स्वाती शिंदे यांनी केला. त्या ठिकाणी विभागाचे यांना बोलावून सत्य परिस्थिती जाणून घेतली. त्या ठिकाणी या ठिकाणाहून त्वरित सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना तातडीने फोन लावला व सदरची परिस्थिती व लोकांमध्ये असलेली नाराजी सांगितली. तसेच कंत्राटदार व महापालिका बांधकाम प्रशासन यामधील ताळमेळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तातडीने महापालिकेने काम प्राधान्याने करावे अशी मागणी केली. यावर आयुक्तांनी तातडीने उद्याच्या उद्या ड्रेनेज विभागाचे काम चालू होईल असे अशी ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, माधुरी वसगडेकर, प्रीती काळे, शैलेजा कोळी, अरुणा बाबर, वैशाली शेळके, गंगुताई नाईक, स्नेहल जगताप, स्मिता भाटकर, लीना सावर्डेकर, शोभा राजमाने आदिंसह महिला उपस्थित होत्या.