हक्कासाठी प्राण पणाणे लढूू- तासगावमध्ये ओबीसी बांधवांची बैठक संपन्न

सांगली (प्रतिनिधी)

ओबीसी व्हिजेएनटी,एसबीसी,लिंगायत,मुस्लिम ओबीसी, बलुतेदार,अलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी आता एक होऊन लढण्याची वेळ आली असून सकल ओबीसी समाजाच्या संरक्षणासाठी आता सारे रान उठवून प्रसंगी प्राण पणाला लावू अशी प्रतिक्रिया सहा ऑगस्ट रोजी दुपारी तासगाव मध्ये शालिनी पॅलेस हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या बैठकीत ओबीसी बांधवांनी व्यक्त केली आहे.

सदर बैठक ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या नियोजन समितीचे समन्वयक विष्णू माने व संगीता ताई खोत,अरुण खरमाटे,संजय विभुते,संजय पाटील,एडवोकेट विनायकराव पाटील, अर्जुन थोरात,उत्तम जानकर, बबन यमगर,जनार्दन शेळके, सोमनाथ कुंभार,अब्दुल मुल्ला, संजय चव्हाण, विजय धनवडे, जि ए पाटील, सुनील गुरव, डॉक्टर विवेक गुरव,रमेश मदने, बबन सुतार, ज्ञानेश्वर खरात,महेश कुंभार, दत्तात्रेय बामणे आदी मान्यवरांसह इतर अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.

About The Author