तलाठी शिवाजी नरुटे यांचे महसूलचे कामकाज आदर्शवत – तानाजी यमगर
प्रशासकीय बदली निमित्त कुकटोळी ग्रामस्थांचेवतीने निरोप समारंभ संपन्न
कवठेमहांकाळ (प्रतिनिधी)
शिवाजी नरुटे यांनी तलाठी म्हणून उत्तम कामाचा ठसा उमटवला. शेतकरी, तसेच वंचित घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून तत्पर असणारे आदर्श तलाठी म्हणून शिवाजी नरुटे या आण्णासाहेबांची ओळख आहे असे गौरोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य, कुकटोळीचे सरपंच तानाजी यमगर यांनी काढले.
तलाठी नरुटे यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर कुकटोळी ग्रामपंचायत व सोसायटीच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी तानाजी यमगर यांचे हस्ते तलाठी नरुटे यांचा हार,शाल, फेटा,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना यमगर पुढे म्हणाले, भारतीय सैन्यात देशसेवा करून निवृत्त झाल्यानंतर नरुटे आण्णा हे महसूल विभागात तलाठी म्हणून रुजू झाले, त्यांनी हिंगणगाव, करोली, अग्रनधुळगाव, कोंगनोळी, कुकटोळी, सराटी, रामपूरवाडी अशा ठिकाणी तलाठी म्हणून काम पाहिले, या भागातील लोकांना उतारा, विविध दाखले, आकस्मिक आपत्ती नंतर पंचनामा किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून आदर्श काम केले.
यावेळी तानाजी दादा यमगर यांचेसह उपसरपंच शिवाजी कारंडे सर, अजित हाक्के, महेश देसाई,ज्ञानू बोराडे, मालोजी यमगर,दामोदर सुतार, शिवाजी पाटील, विरेंद्र कारंडे,राहुल कोळेकर, मारुती बोराडे, बटाव पुणेकर,खंडू पाटील, विश्वास कदम,वसंत सदामते, अरुण हजारे, उत्तम वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.