यळगुड येथे पंक्चर दुकानदाराचा निघृण खून
हुपरी ता. ३० (प्रतिनिधी):- यळगुड ता.हातकणंगले येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या समोर असलेल्या पेट्रोल- टायर पंक्चर दुकानदाराचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री निघृण खून केल्याची घटना घडली आहे. गिरीष पिल्लाई (वय ५०, मुळ केरळ, सध्या रा. विशालनगर, हुपरी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दुकानातच हा खून झाला संपूर्ण पंचक्रोशी हादरुन गेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे व पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांच्यासह हुपरीचे पोलीस अधिकारी निंगाप्पा चौखंडे हे घटनास्थळांवरील माहिती घेऊन तपास करीत आहेत. गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चरचे गेल्या २५ वर्षांपासून दुकान आहे. त्यांची पत्नी हुपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पत्नी व मुलांना आपल्या मूळ गावी केरळ मध्ये पाठविले होते. त्यांना रात्री फोन केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.त्यामुळे त्यांनी पतीच्या मित्राला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मित्राने गिरिष यांच्या दुकानात जाउन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.