प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विनोद परमशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाषनगरमध्ये वृक्षारोपण
कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ व नेताजी सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण सोसायटीचा उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
निसर्गाचा समतोल राखायचा तर झाडे लावा, झाडे जगवा आणि वाढवा असा संदेश मिरज येथील प्रसिद्ध धनवन्तरी डॉ. विनोद परमशेट्टी यांनी दिला. मिरजेतील सुभाषनगर गृहनिर्माण सोसायटी येथे डॉ. परमशेट्टी यांच्या हस्ते झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी उपस्थितांना हा संदेश दिला. डॉ. परमशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण सोसायटीच्या मोकळ्या मैदानात कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरम सांगली, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ व नेताजी सुभाषचंद्र बोस गृनिर्माण सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरवातीस दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरम या संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब हल्लोळे, राज्य सल्लागार संजय कुलकर्णी, राज्य समन्वयक प्रताप गस्ते, जिल्हा समन्वयक सूर्यकांत तवटे, जिल्हासचिव राजू पाटील, डॉ. विकास पाटील, न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मिलिंद आग्रवाल, एस. बी. पाटील, दौलत खटावकर, मुनाफ पटेल, शंकर माळी, रमेश हेगाणा आदी उपस्थित होते.
पत्रकार जगदीश धुळूबुळू, विनायक क्षीरसागर, नेताजी सुभाषचंद्र बोस गृहनिर्माण सोसायटीचे सचिव देवेंद्र बावरे यांनी स्वागत व संयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, मुनाफ मालगावे, काकासो शिनगारे, सुलेमान मुजावर, प्रमोद कोलप, सुरज भगत, नितीन चिंचवडकर, अजित खोत, बाबासाहेब आळतेकर, अरविंद कांबळे, प्रमोद क्षीरसागर, संदीप तोडकर, परसराम कोळी, विक्रांत लोंढे, मधुकर सावंत, मुळे, कोले, विकास सागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.