शासनाच्या योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देणार – प्रवीण माने

आष्टा (प्रतिनिधी)

भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्याने शासनाच्या योजनांचा आष्टा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शहरातील बांधकाम कामगारांना विना त्रास शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देणार आहोत, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ माने यांनी केले. आष्टा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना पेटी आणि भांडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संदीपभाऊ गायकवाड, उदय कवठेकर, दादासाहेब वाघमारे, बंडुभाऊ गायकवाड, विश्वजीत पाटील, जयवंत खोत, मनोहर खोत, विकास खंबाळे, नरेंद्र घाटगे, आरबाज मुजावर, निलेश पाटील, शोएब सनदे रविराज चव्हाण,शोभाताई हालुंडे, वैशाली झिंनगे यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवीणभाऊ माने म्हणाले,बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळण्यास मदत होते. शासनाच्या बांधकाम कामगारांच्या महत्वकांशी योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारले आहे.‌ बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होऊ लागला आहे. निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यामुळे वाळवा विधानसभा मतदारसंघातील अनेक बांधकाम कामगारांना मोठी मदत मिळू लागली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. व संदीपभाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वागत आणि प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजन संदीप गायकवाड यांनी केले. जयवंत खोत यांनी आभार मानले.

About The Author