लिंगनूरमध्ये ट्रॅक्टरखाली सापडून ८ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
मिरज (प्रतिनिधी)
लिंगनूर (शिंदे मळा) येथे ट्रॅक्टर खाली सापडून ८ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. स्वरुप ज्ञानेश्वर शिंदे असे मृत मुलाचे नाव असून घटनेने लिंगनूर गावात शोककळा पसरली आहे. रविवारी रात्री ही दुःखद घटना घडली.
अधिक माहिती अशी कि, मिरज तालुक्यातील लिंगनूर येथून दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या शिंदे मळा या ठिकाणी रविवारी स्वरुप ज्ञानेश्वर शिंदे (वय ८) हा मुलगा टँक्टर खाली सापडून डोक्याला जोरात मार लागल्यामुळे त्याचा जागीच मयत झाला. या घटनेने परिसर हादरला आहे. ट्रॅक्टर खाली सापडल्याने त्याच्या वडीलांनी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता डाँक्टरांनी तपासून उपचारापुर्वी मयत घोषित केले. लहान मुलाच्या मृत्युच्या घटनेने लिंगनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वरुप शिंदे हा लिंगनुर गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर शिंदे हे लिंगनूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.