आष्ट्यात आज स्व.मा.आ.विलासराव शिंदे प्रेमींचा स्नेह मेळावा
आष्टा (प्रतिनिधी)
दीपावली आणी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उद्या शुक्रवार ता.8 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. सांगली जिल्हा अध्यक्ष स्व.माजी आमदार विलासराव शिंदे प्रेमी व निष्ठावंतांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातून समर्थक उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती संयोजकानी दिली.
स्व.माजी आमदार विलासराव शिंदे यांनी स्व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील लोकनेते राजारामबापू पाटील, स्व माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या सोबत काम केले. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत वाळवा(आताचा इस्लामपूर ) मतदार संघातून ते विजयी झाले होते.दीर्घ काळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले. 1999ते 2019या काळात राष्ट्रवादी चे सांगली जिल्हाआध्यक्ष म्हणून मजबूत पक्ष बांधणी केली होती.2004 नंतर विधासभेचे आमदार म्हणून काम पहिले. आष्टा नगरपालिकेत 25 वर्षे शिंदे गटाची सत्ता आहे.स्व विलासराव यांच्या विचारांचा वारसा जोपासणारा निष्ठावंत शिंदे प्रेमींचा मोठा गट जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या शिंदे प्रेमींनी एकत्र यावे व त्यांच्यात संवाद साधावा या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी स्व.माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर शिंदे प्रेमीचा 2019 ला मेळावा झाला होता.
शुक्रवार दि. 8 रोजी सायंकाळी पाच वाजता आष्टा – तासगाव रोड येथील हेव्हन हॉल येथे हा दुसरा मेळावा वैभव शिंदे, झुंझारराव शिंदे, विशाल शिंदे, झुंझारराव पाटील,व निष्ठावंतांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या मेळाव्याकडे शिंदे गटाच्या नजरा लागल्या आहेत.