धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत जनता माझ्यासोबत – तानाजी सातपुते

ग्रामीण भागात सातपुते यांनी प्रचाराचा जोर वाढविला 

मिरज (प्रतिनिधी)

मिरजचा स्वाभिमान टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आपला जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे त्यांच्या उमेदवारी सर्वसामान्य नागरिकांतून प्रतिसाद सुद्धा मिळू लागला आहे. मिरज विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात म्हैशाळ येथे अनेक ठिकाणी भेटी देत प्रस्थापितांच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या जनतेशी संवाद साधला.

नागरिकांच्या अनेक समस्यांच्या विविध मुद्द्यांवर संवाद साधत म्हैशाळच्या उज्वल भविष्यासाठी यंदा मशाल हाती घेण्याचा संकल्प दिला. नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी दिले. अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले. अनेक घरे, नुकसानग्रस्त नागरिक, समूह केंद्र, मंडळ आणि विविध सामाजिक ठिकाणी भेटी देत नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्याबरोबर बजरंग पाटील, किरण कांबळे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

About The Author