रंकाळा तालीमची विजयी सलामी तर पीटीएम – सम्राटनगर बरोबरी

0
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर. (प्रतिनिधी)
             कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. संध्यामठ तरुण मंडळने रंकाळा तालीम मंडळवर टायब्रेकरमध्ये मात करून विजयी सलामी दिली.विजयामुळे संध्यामठला तीन गुण प्राप्त झाले. पीटीएम अर्थात पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस् यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
                कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगने सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामाचा शुभारंभ झाला. स्पर्धेचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, होम डीवायएसपी तानाजी सावंत, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून झाले. याप्रसंगी केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, उपाध्यक्ष बाळ निचिते, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने, नंदकुमार बामणे, तेज घाटगे, अभिषेक मोहिते, अजित जाधव, संभाजी मांगोरे – पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे, श्रीनिवास जाधव, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *