अरुणा पाटील हिची मुंबई कारागृह पोलीस पदी निवड.

0
1000157711

शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील शिराळे – वारुण येथील कुमारी अरुणा नामदेव पाटील हिची मुंबई पोलीस दलात कारागृह पोलीस पदी निवड.

          शाहूवाडी तालुक्यातील शिराळे- वारुण हे गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावची कन्या अरुणा नामदेव पाटील हिची मुंबई पोलीस दलात कारागृह पोलीस पदी निवड झाली आहे.अरुणाचे आई वडील रोजगार – धंद्यानिमित्त मुंबई इथे वास्तव्यास असतात. वडील नामदेव आणि आई सुनीता यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवले,

अरुणा पाटील हिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने खाकी वर्दी साठी योद्धा करियर अकॅडमी घणसोली येथे प्रवेश घेतला. अकॅडमीचे संचालक अमोल दळवी आणि लक्ष्मण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलीस भरतीचा सराव सूरू केला आणि मुंबई पोलीस दलात कारागृह पोलीस पदी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशात तिचे आई, वडील, नातेवाईक आणि योद्धा करियर अकॅडमीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तिच्या या यशामुळे समाजातून तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *