कर्नाटकात इंदिरा किटचे जानेवारीपासून वितरण

0
indira kit


राज्य सरकारने निवडणुक कालावधीत अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदुळ पुरवठा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता तांदळाचा काळाबाजार होत असल्याचे कारण सांगून तांदळाऐवजी इंदिरा किट देण्याचा निर्णय घेतला आहे.या किटमध्ये एक किलो साखर, मीठ, तूरडाळ, एक लिटर खाद्यतेल, 100 ग्रॅम चहा पावडर, 50 ग्रॅम कॉफी पावडर आणि दोन किलो गहू या पदार्थांचा समावेश राहणार आहे. एका किटसाठी किमान चारशे रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. रेशन दुकानाद्वारे आधार लिंक झालेल्या सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना या किटचे वितरण करण्यात येणार आहे. याद्वारे इंदिरा किट आणि अन्नभाग्य योजनेच्या ब्रँडचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे, असेही मंत्री मुनियप्पा यांनी सांगितले. राज्य सरकारकडून सध्या प्रतिसदस्य बीपीएल शिधापत्रिकाधारकांना पाच किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहे.

यामुळे काही कुटुंबांना मासिक 40 ते 50 किलो तांदूळ मिळत असल्याने (आवश्‍यकते पेक्षा जास्त) अतिरिक्त तांदळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी यापुढे इंदिरा किट देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. योजना राबविताना आरोग्याच्यादृष्टीने विचार केला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर माोठा भार पडणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रारंभी प्रायोगिकरीत्या योजना लागू करण्यात येणार आहे. नंतर या योजनेचे मूल्यमापन करून संपूर्ण राज्यात विस्तार करण्यात येणार आहे. किटसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी राज्य नागरी पुरवठा निगमद्वारे किंवा अन्य एजन्सीद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. इंदिरा किटमुळे तांदळाची होणारी नासाडी, काळा बाजार यावर आळा बसण्याची शक्यता आहे. तर शिधा पत्रिकाधारकांना सोयीचे ठरण्याचा विश्‍वास खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *