कमला कॉलेज मध्ये स्वदेशी दिनाची शपथ
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कोल्हापूर (प्रतिनिधी) कमला कॉलेज मध्ये ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील साहेब व प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वदेशी दिनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी भारतीय उत्पादनांना प्राधान्य हावे. स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजे देशाच्या विकासासाठी चालना देणे होय. स्वदेशी वस्तूंंच्या वापरामुळे देशाचा आर्थिक व सामाजिक विकास होतो. कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आपण स्वदेशीचा वापर करावा.
यानंतर विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी ‘स्वदेश दिनाची’ शपथ देण्यात आली. या प्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ तराळ, प्रा. श्रीमती स्वाती कांबळे, प्रा. श्रीमती एस. एस. वासमकर, प्रा. श्रीमती चिन्मयी सांगळे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


