राजर्षी छत्रपती शाहू काँलेजमध्ये कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

0
कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमाणपत्र वितरण करताना

कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमाणपत्र वितरण करताना मान्यवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मधील ज्युनिअर कॉलेज विभागामध्ये रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी च्या वतीने दक्षिण विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ. डी. आर. भोसले साहेब होते, रोपाला पाणी घालून वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

        ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या सौ. एल. बी. चव्हाण मॅडम यांनी प्रास्तविक करुन मान्यवर, स्पर्धक, पालक व परीक्षक यांचे स्वागत केले. यानंतर परीक्षक म्हणून उपस्थित असणारे राजकुमार कोळके सर (श्री.पद्याराजे विद्यालय, शिरोळ), संदिप देवकुळे सर (शांता रामकृष्ण दातार विद्यालय, हुपरी) व  बी. डी. भोसले सर (रा. बा. विद्यालय, सडोली खालसा) या परीक्षकांचे कॉलेजच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले, मनोगतात ते म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्धाच्या भाषण कौशल्याचा विकास होतो. रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा इ. स्पर्धा घेऊन विद्यार्थामध्ये असणाऱ्या विविध कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न केला जातो ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे, शालेय जीवनापासून आपल्या विद्यार्थांमध्ये वक्तृत्व कौशल्य निर्माण झाले पाहिजे, रयतचे विद्यार्थी माननीय प्रा. नितीन बानगुडे हे पुढे जावून मोठे वक्ते झाले, नियमित तयारी केली तर प्रभावीपणे भाषण करता येते, विद्यार्थी जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याचे व्यक्तिमत्त्व समजून येत नाही, बोलणे प्रभावी करायचे असल्यास ज्ञानात वाढ करावी लागेल.

    स्पर्धेचे विजेते तीन गटामध्ये प्रत्येकी पाच विजेते याप्रमाणे घोषित केले ते पुढील प्रमाणे   

गट क्रमांक 1  (5 वी ते 7 वी) 1) नेल्सन प्रकाश नाईक-प्रथम (महात्मा गांधी विद्यालय, सरुड) 2) कु. शुभ्रा शशिकांत खोत द्वितीय (कल्लेश्वर हायस्कूल, टाकवडे) 3) मुकीद अफजल मुजावर-तृतीय (पद्याराजे विद्यालय, शिरोळ) 4) कु. आर्या अमोल माने चतुर्थ (कल्लेश्वर हायस्कूल, टाकवडे) 5) कु. परिणिती संदिप कोळी पंचम (रु.पा. माने कन्या विद्यालय, शिरोळ)

गट क्रमांक 2 (8 वी ते 10 वी) 1) कु. वृषाली शंकर पाटील-प्रथम (शाहू हायस्कूल, शाहूवाडी) 2) शौर्य शिवाजी ठोंबरे द्वितीय (ल. पा. हायस्कूल जयसिंगपूर) 3) कु. धनश्री कृष्णात शिरढोणे-तृतीय (न्यु इंग्लिश स्कूल, यळगुड) 4) कु. उत्कर्षा उदय पाटील (रा. बा. पाटील विद्यालय, सडोली खालसा) 5) कु. श्रीशा गणेश रेंदाळे (लक्ष्मीदेवी गर्ल स्कूल, हुपरी) उत्तेजनार्थ

गट क्रमांक 3 (11 वी व 12 वी) 1) कु.संचिता नरेंद्र चिंचवाडे प्रथम (महात्मा गांधी माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, रुकडी) 2) कु.खदिजा अख्तर अत्तार – द्वितीय (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर) 3) कु. आकांक्षा मिलिंद सावंत- तृतीय (राजषीं छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर) कु.अ  4) कु. प्राची राजेंद्र भोपळे – चतुर्थ (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर) 5) कु. तेजस्वी आखिन भोपळे पंचम (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर)

  कार्यक्रमाचे आभार ज्युनिअर कॉलेज विभागातील कर्मवीर विद्याप्रबोधिनी विभागाच्या प्रमुख सौ. एम. डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या सौ. एल. बी. चव्हाण मॅडम, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाड सर, शांता रामकृष्ण दातार हायस्कूल, हुपरी चे प्र. प्राचार्य संजय पाटील व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एम. जे. थोरात यांनी केले.

   स्पर्धेत परीक्षक म्हणून  राजकुमार कोळके (पद्याराजे विद्यालय, शिरोळ),  संदिप देवकुळे सर (शांता रामकृष्ण दातार विद्यालय, हुपरी) व बी.डी. भोसले (रा. बा. विद्यालय, सडोली खालसा), के.आर. पाटील,  ए. एस. पाटील, पी. बी. चव्हाण (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर) यांनी काम पाहिले

  स्पर्धेचे सर्व नियोजन राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मधील कर्मवीर विद्याप्रबोधिनी विभागाच्या प्रमुख सौ. एम डी. पाटील मॅडम, सदस्य सौ. एम. जे. थोरात व सदस्य श्री. यु. डी मगदूम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *