संयोगिता पाटील यांनी शिक्षण सर्वसामान्यांच्या घरात पोहचवले -श्रीरंग कुलकर्णी

0
gpmt (2)

मिरजेत केंब्रिज स्कूलच्या शिल्पकार स्व. संयोगिता पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
मिरज (प्रतिनिधी)

मिरज आणि पंचक्रोशीतील बहुजन समाजातील हजारो लेकरांना केंब्रिज इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून घडवलेल्या स्व. संयोगिता पृथ्वीराज पाटील यांच्या जयंतीनिमित्त संयोगिता पाटील केंब्रिज स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दीपप्रज्वलन व त्यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. तसेच गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील विविध शाखांमध्येही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे श्रीरंग कुलकर्णी म्हणाले, संयोगिता पाटील यांनी शिक्षणाचा दिवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या शिस्त, संस्कार, दूरदृष्टीने आणि प्रेमळ मार्गदर्शनाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. विद्यार्थी कितीही मोठा झाला. तरी आपण विद्यार्थीच आहोत हे मात्र कधीही विसरले नाही पाहिजे. उत्कृष्ट मानवतावादी गुण विद्यार्थ्यांमध्ये तयार झाले पाहिजेत. शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांची जडणघडण करीत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत असते, चांगल्या गोष्टी नेहमी आत्मसात केल्या पाहिजेत.

उद्याचा नवीन समाज व नवीन पिढी घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. या स्कूलचे आधारस्तंभ पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पाटील, कॅम्पस कोऑडीनेटर डॉ. सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या मेहनतीवर वहीनींच्या स्वप्नातील शाळा उभी असुन नावारूपाला आलेली आहे.

कार्यक्रमात उपस्थितांनी संयोगिता पाटील वहीनी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची ओळख दर्जेदार शिक्षणसंस्था म्हणून निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. वहीनींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करत कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास वहीनींच्या आई श्रीमती जयमाला पवार, विजयसिंह सूर्यवंशी, माजी विद्यार्थिनी गार्गी कुलकर्णी, शाळा अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टीन, प्राचार्य बिभीषन कराळे, साहेबलाल शरीकमसलत, रफिक तांबोळी, इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *