कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला निव़डणूक कार्यक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या प्रलंबित निवडणूका अखेर जाहीर झाल्या. अनेक दिवसापासून मनपाचा कारभार प्रशासक चालवत होते. राज्यातील अनेक महापालिकांच्या सभागृहाची मुदत संपल्यामुळे गेली तीन ते पाच वर्ष अनेक ठिकाणी नगरसेवक नाहीत. एक प्रकारे प्रशासक राज चालू होते. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग त्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत आहे. आज आचारसंहीता जाहीर होत राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला .
आज 15 डिसेंबर पासून आचारसंहीता लागू केली. त्याबरोबर नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख 23 ते 30 डिसेंबर असेत. प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत 02 जानेवारी आहे. चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी 03 जानेवारी रोजी जाहीर होईल. मतदान 15 जानेवारी रोजी होईल. 16 जानेवारी रोजी मतमोजनी होऊन निकाल स्पष्ट होईल. संपूर्ण राज्यभरात महापालिकेसाठीकेत एकाच वेळी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.
जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कोल्हापूर महानगर पालिका निवडणूकीसाठी 15 जानेवारी ला होणार आहे. त्याबरोबर 16 ला निकाल जाहिर होईल. 29 महानगरपालिका मध्ये एकूण 2869 जागेसाठी 1442 महीला, 341 अनुसुचित जाती, 77 अनुसुचित जमाती, 759 नागरीकांचा मागास प्रभाग आशा पध्दतीने आरक्षित जागासाठी निवडणूक होईल. या निवडणूक कामासाठी 1,96,005 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.


