‘राम आएंगे…’; जर्मन गायिकेने गायले श्री रामाचे भजन! पीएम मोदींनी केले कौतुक

अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. २२ जानेवारीला रामललाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही अयोध्येला पोहोचणार आहेत. दरम्यान, देशभरातील आणि जगभरातील लोक प्रभू रामाच्या नावाचा जप करणार आहे. काही लोक श्री रामाचे भजन गाणार आहे. ही गाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत शेअर करत आहेत. नेपाळपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका जर्मन गायिकेचा श्री रामाचे भजन गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये गायक ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी’ हे गाणे गाताना दिसत आहे. राम भजनासाठी सोशल मीडिया यूजर्सनी जर्मन गायिकेचे कौतुक केले आहे. ‘कॅसांड्रा मे स्पिटमन'(‘Cassandra May Spitman) असे या जर्मन गायिकेचे नाव आहे. सोशल मीडियावर लोक कॅसांड्राच्या गाण्याचं खूप कौतुक करत आहेत. “यांच्यामध्येही राम वसतो” असे एकाने म्हटले आहे. नेटकरी सतत ‘जय श्री राम’ अशा कमेंट व्हिडीओवर करत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जर्मन गायिका कॅसांड्राच्या गाण्यांचे कौतुक केले आहे. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही केला होता.

About The Author