मिरजेत सचिन हॉस्पिटलमधील स्त्री रोग मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील सचिन हॉस्पिटलमध्ये रविवार (दि.23) फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मोफत मार्गदर्शन शिबिरास दांपत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात महाराष्ट्र व कर्नाटकमधील महिला तसेच अपत्यहीन दांपत्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, अशी माहिती डॉ. सचिन सुगाण्णावर व डॉ. सौ. नेहा सुगाण्णावर यांनी दिली.
यावेळी डॉ. सचिन सुगाण्णावर म्हणाले, मुल न झालेल्या दांपत्यांवर व स्त्रियांमधील सर्व आजारांवर हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केेले जातात. सचिन हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्री रोग व वंध्यत्व निवारण (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटर आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सचिन हॉस्पिटलतर्फे स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मार्गदर्शन शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येते. रविवारी (दि.23) फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या शिबिरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. औषधोपचार , आय.यु. आय. व टेस्ट ट्यूब बेबीच्या पर्यायाविषयी यावेळी उपस्थितांबरोबर चर्चा करण्यात आली. शिबिराला मोठ्या संख्येने दांपत्य उपस्थित होते, तसेच शिबिरात सहभागी झालेल्यांवर सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात, असेही डॉ. सचिन सुगाण्णावर म्हणाले.