मिरजेतील खून प्रकरणी आरोपीस सोलापूर जिल्ह्यातून अटक; शहर पोलिसांची कारवाई

0
WhatsApp Image 2025-02-27 at 7.44.29 AM

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत कोयता आणि चाकूने हल्ला करून कुणाल दिनकर वाली (वय २३) याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात काही तासातच पोलिसांना यश आले होते. मात्र यातील मुख्य संशयित हा फरार झाला होता. त्यास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. खून प्रकरणी तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मिरजेतील कमानवेज परिसरातील अग्निशमन केंद्राजवळ ही कुणाची घटना घडली होती. कुणाल दिनकर वाली याच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली (वय २०) यास गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी अजित दाविद भोसले (वय ३५, रा. तासगाव वेस झोपडपट्टी, मिरज), रुपेश दिलीप होळकर (वय ४०, रा. कमान वेस, कॅमरन स्कूल जवळ), गजा उर्फ प्रज्वल उर्फ प्रकाश नायडू (वय २५, रा. कमान वेस, शाळा नंबर पाच जवळ, मिरज) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापैकी रुपेश होळकर आणि गजा उर्फ प्रकाश नायडू या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मात्र यातील अजित दाविद भोसले हा आरोपी फरार झाला होता. मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे फरार अजित भोसले याचा पोलिसांनी शोध घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कडलास या गावातून पोलिसांच्या पथकाने त्यास अटक केली. यामुळे मिरजेतील खून प्रकरणातील तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, पृथ्वी कांबळे, निलेश कदम, गजानन बिरादार, झाकीरहुसेन काझी, लक्ष्मण कौजलगी, स्वप्निल नायकोडे, दीपक परीट, केंगार आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *