हातकणंगलेसाठी 55 तर कोल्हापूरसाठी एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 एप्रिल पासून दिनांक 19 एप्रिल पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 28 उमेदवारांनी 42 नामनिर्देशपत्र दाखल केली तर हातकणंगले मतदारसंघासाठी 36 उमेदवारांनी 55 नामनिर्देशपत्र दाखल केली. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशपत्रांची छाननी केली जाणार असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजीची आहे.

 शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी अरविंद भिवा माने (पक्ष –भारतीय राष्ट्रीय दल) 1 अर्ज व अपक्षमधून 1 अशी 2 नामनिर्देशनपत्र,  संजय भिकाजी मागाडे (पक्ष –बहुजन समाज पार्टी), मुश्ताक अजीज मुल्ला (पक्ष –अपक्ष), बाजीराव नानासो खाडे (पक्ष –अपक्ष), माधुरी राजू जाधव (पक्ष –अपक्ष), ॲड. यश सुहास हेडगे-पाटील (पक्ष –अपक्ष), कृष्णाबाई दिपक चौगले (पक्ष –अपक्ष), मालोजीराजे छत्रपती शाहू छत्रपती (पक्ष –अपक्ष), सुभाष वैजू देसाई (पक्ष –अपक्ष), इरफान आबुतालिब चांद (पक्ष –अपक्ष), राजेंद्र बाळासो कोळी (पक्ष –अपक्ष), मंगेश जयसिंग पाटील (पक्ष –अपक्ष), कुदरतुल्ला आदम लतीफ (पक्ष –अपक्ष) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.

       शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. यात अपक्ष महम्मद मुबारक दरवेशी, बहुजन समाज पार्टी रविंद्र तुकाराम कांबळे यांचे 2 अर्ज, स्वाभिमानी पक्ष राजू ऊर्फ देवापान्ना शेट्टी, कामगार किसान पार्टी संतोष केरबा खोत, अपक्ष सत्यजीत बाळासो पाटील, अपक्ष माने अरविंद भिवा यांचे 2 अर्ज, अपक्ष राजेंद्र भिमराव माने, अपक्ष धैर्यशिल संभाजी माने, अपक्ष अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, अपक्ष लक्ष्मण शिवाजी तांदळे, अपक्ष विश्वास आनंदा कांबळे, अपक्ष वेंदातिका धैर्यशिल माने, अपक्ष परशुराम तमन्ना माने, अपक्ष अस्मिता सर्जेराव देशमुख, नेशनल ब्लॅक पँथर पार्टी शरद बाबुराव पाटील, अपक्ष जावेद सिंकदर मुजावर, अपक्ष सुनिल विलास अपराध, अपक्ष आनंदराव वसंतराव सरनाईक, अपक्ष दिनकरराव तुळशीदास चव्हाण, अपक्ष डवरी श्रीमती गोविंदा यांचा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केले.

यापुर्वी दाखल झालेले अर्ज – :

शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा यांनी नामनिर्देशन दाखल केले.

सोमवार दि. 15 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी संजय सदाशिवराव मंडलिक (पक्ष – शिवसेना) यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे 4 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. तसेच सौ. रुपा प्रविण वायदंडे (पक्ष – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) व संजय भिकाजी मागाडे (पक्ष – अपक्ष) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले. 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना) यांनी 4 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली. तसेच 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष – स्वाभिमानी पक्ष) यांनी 2 नामनिर्देशनपत्रे तसेच शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष – अपक्ष), महंमद मुबारक दरवेशी (पक्ष – अपक्ष) आणि संतोष केरबा खोत (पक्ष – कामगार किसान पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

मंगळवारी दि. 16 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू शहाजी छत्रपती (पक्ष -इंडियन नॅशनल काँग्रेस) 3 अर्ज व अपक्ष मधून 1 अर्ज अशी 4 नामनिर्देशनपत्रे तर संदिप नामदेव शिंदे (पक्ष – बहुजन समाज पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.    48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सत्यजित बाबासो पाटील (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन अर्ज, रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष – बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष) एक अर्ज, मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष) एक अर्ज व रघुनाथ रामचंद्र पाटील (अपक्ष) एक अर्ज अशा पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्रे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली आहेत.

गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी संदिप नामदेव शिंदे (पक्ष –बहुजन समाज पार्टी) 1 अर्ज, संदिप भैरवनाथ कोगले (पक्ष –देश जनहित पार्टी) 2 अर्ज व अपक्षमधून 2 अशी 4 नामनिर्देशनपत्र, नागनाथ पुंडलिक बेनके (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, संदिप गुंडोपंत संकपाळ (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, संतोष गणपती बिसुरे (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी) 1 अर्ज, कृष्णा हणमंत देसाई (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, सलीम नुरमंहमद बागवान (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, सुनील नामदेव पाटील (पक्ष –नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी) 1 अर्ज, राहुल गोविंद लाड (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, बसगोंडा तायगोंडा पाटील (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी) 1 अर्ज, विरेंद्र संजय मंडलिक (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज, शशिभूषण जीवनराव देसाई (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा) 1 अर्ज व अपक्ष 1 अर्ज अशी 2 नामनिर्देशनपत्रे  अशा 12 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी रविंद्र तुकाराम कांबळे, (पक्ष- बहुजन समाज पार्टी) 1 अर्ज, देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष) 1 अर्ज, बाबासो यशवंतराव पाटील, (अपक्ष) 1 अर्ज, रघुनाथ रामचंद्र पाटील, (पक्ष- भारतीय जवान किसान पार्टी) 1 अर्ज, डॉ. श्री. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी) 1 अर्ज, आनंदराव तुकाराम थोरात, (पक्ष- अपक्ष) 1 अर्ज, म्हेत्रे बाळकृष्ण काशिनाथ (पक्ष- अपक्ष) 1 अर्ज, संतोष केरबा खोत, (पक्ष-कामगार किसान पार्टी) 1 अर्ज, अपक्ष 1 अर्ज अशी 2 नामनिर्देशनपत्रे, मनोहर प्रदीप सातपुते, (अपक्ष) 2 अर्ज, इम्रान इकबाल खतिब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी) 1 अर्ज,  श्री. जगन्नाथ भगवान मोरे, (अपक्ष) 1 अर्ज, धनाजी जगन्नाथ गुरव (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी) 1 अर्ज, पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा (पक्ष – वंचीत बहुजन आघाडी) 2 अर्ज व रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष) 1 अर्ज,  अशा 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली आहेत.

About The Author