संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत  – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर, (प्रतिनिधी) ‘महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाचे व्हीजन घेऊन नेतृत्व करणाऱ्या मोदींना मत.’ असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. येथील मुक्त सैनिक वसाहत मध्ये मिसळपे चर्चेत ते बोलत होते. आज वाघाची तालीम चौक व उत्तरेश्वर पेठ, मिरजकर तिकटी येथेही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मिसळ पे चर्चा झाली. 

खासदार महाडिक म्हणाले, देशाच्या विकासाचे व्हीजन घेऊन कार्यरत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया. संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत. म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणूया.

यावेळी सत्यजित कदम, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, अशोक भोईंगडे, भगवान काटे, विजय वाणी, अमर क्षीरसागर, मनोहर झेंडे, राजीव निपाणी, शेखर खापणे, दीपिका जाधव, अर्चना पगारे, रसिका शेळके, वैभव माने, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघाची तालीम चौक व उत्तरेश्वर पेठमधील मिसळ पे चर्चा झाली.

   यावेळी माजी महापौर आदिल फरास म्हणाले, की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात प्रचंड निधी मिळाला. त्यामुळेच विमानतळ, नाईट लँडिंग विमानसेवा, मुंबईला दररोजची विमानसेवा, टर्मिनल वास्तू, चाळीस फुटी रस्ता, पुणा- बेंगलोर सहा पदरी रोड, बास्केट ब्रिज, अशी कामे झाली.

About The Author