आष्ट्यात सुज्ञ मतदाराचा दादावरच बुमरँग
जेवणावळी, अन पैशाच्या बळावर मतदारांना गृहीत धरणाऱ्या दादांचे मतदारांनी गणपती उठवले ; राष्ट्रवादीतून भाजपात पक्षप्रवेश
आष्टा (डॉ. तानाजी टकले)
तोंडावर निवडणुका आल्या की सहा महिने जेवणं दिली,पैसं टाकले की मतदार आपोआप मागणं पळत्यात असा कयास असणाऱ्या उद्योगझोड नगरसेवकाला त्याच्याच प्रभागातील सुज्ञ मतदारांनी सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांच्या भाजपा प्रवेशाने साडेचार वर्षे गायब, सहा महिने सक्रिय नगरसेवकांची चांगलीच गोची झाली आहे. जेवण अन पैसाच्या बळावर मतदारांना गृहीत धरण्याच्या वृत्तीने प्रभागात पार्टीच धोक्यात येऊन ठेपली आहे.ज्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत तिकीट मिळवणं मुश्किल बनून उद्योगझोड कारभाऱ्याचा राजकीय प्रवास पत्ता कट होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. आ जयंत पाटील यांनी स्थानिकांना सुधरा असे कानडोस दिले असल्याने सध्या शहरात दादा चांगलेच चर्चेत आहेत.
ब्रिटिशकालीन आष्टा नगरपालिका,सुमारे पन्नास हजार लोकसंख्या पालिकेचे नगरसेवक पद म्हणजे शहरात वटच म्हणायचा. आष्टा नगरपालिकेत नगरसेवक पदाची संधी मिळणे तसं मुश्किल काम. इथं कामातूनच कर्तृत्व सिद्ध करावं लागत. त्यातही खुल्या गटातून संधी म्हणजे अग्निदिव्य. मात्र विकासपुरुस स्व मा आ विलासराव शिंदे यांनी अनेकांना संध्या दिल्या. ज्याच्या मागे गल्लीतील मते ही नाहीत अशांनाही पार्टी मुळे संधी मिळाली.2006 च्या बिनविरोध पालिका निवडणुकीत स्व विलासराव शिंदे यांनी स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागे घेत खुल्या गटातून दादांना उमेदवारी दिली.नव्या उमेदीने त्यांनी पालिकेत दमदार काम करीत नाव केले.पहिल्याच टर्ममधे उपन्गराध्य पदापर्यंत मजल मारली.लोकप्रियता मिळवली.2011च्या पालिका निवडणुकीत दादांचा प्रभाग महिला आरक्षित. झाला आता उमदा नेता उमेदवारीपासून वंचित राहणार हे हेरून दादांनी पत्नीला उमेदवारी मिळवित दुसरी टर्म यशस्वी साधली. अशा करामतीत दादा नेहमीच पुढे राहिलेत या काळात मात्र दादांच नागरिकांच्या समस्याकडे सपशेल दुर्लक्ष झालं की केलं.त्यामुळे नागरिकाची नाराजी ओढवून घेतली. यामुळे 2016 च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता हलला. पार्टीतून विरोध झाला. पण पार्टी फंड,फितूरीतून अंतिम क्षणी त्यांनी नेत्याचा विश्वास संपादित करीत कशीबशी उमेदवारी मिळवली. पण त्यांच्या विरोधात एकाने बंड केले.
पराभवाचे सावट गडद मांडरत असताना अंतिम क्षणी आर्थिक तडजोडी, जेवणावळीने, कमी फरकाने का असेना दादा विजयी झाले. उदयोगी प्रतिष्ठा मिळवलेली लोकप्रियत्ताअन मिळालेले कमी मताधिक्य याचे खापर त्यांनी सहयोगी सदस्यावर फोडित, सहयोगी कडून प्रभागात खर्च झालेले लाखो रुपये वसूल केले.अन बुडत्याचा पाय खोलात त्यानुसार इथूनच त्यांच्या लोकप्रियेतेला आणखी घसरणं सुरु झाली. कामातून न्हवे तर शेवटच्या दिवसात पैसा जेवणावळी दिली की मतदार पाठीमागे येतात हा नूनगांड दादांच्यात भरला.अन दादांनी जेवण, पैसा दिला की मतदार पाठीमागे येतात हा कयास केला. तसं खुलं मत अनेक ठिकाणी त्यांनी व्यक्त्तही केलं जे प्रत्यक नागरिकांपर्यंत व्हायरल झालं.ज्यामुळे मतदार दादापासून अन दादा मतदारापासून दुरावत गेलं. अन सात वर्षे दादा विजनवासात राहिले. प्रभागात एकही काम नाही की संपर्क,ना देणगी, ना मंडळाना वर्गणी..जनता हे हेरून होती. आता निवडणूक तोंडावर आलेने मनाने मोठे दादा छोट्या छोट्या कार्यक्रमातुन सक्रिय दिसत आहेत.
एकेकाना गाडीत घेऊन जेवणावळी सुरु झालीय. मात्र दादांचा जीव की प्राण असणाऱ्या धरणग्रस्त मतदारांनी दादाला शह देण्याच्या इराद्याने दादाना सोडचिट्टी देत नुकताच भाजपात प्रवेश केला.दादांचं बुमराँग दादावर पलटी होत असल्याने शहराच्या राजकीय पटलावरील दादा पुन्हा चर्चेत आलेआहेत. आता पालिका निवडणुकीत जाणकार मतदार तारणार… की…… हे काळचं ठरवेल.. तूर्तास शहरात दादाचा विषय लय हार्ड हाय..दादाकडे क्रेडिटचे कार्ड हाय….दादाच प्रभागात नाय ध्यान..म्हणून मतदारांनीच वळवली मान अशी गाणी चर्चा झडत आहे.
आष्ट्यात अस्वस्थ माजी नगरसेवकांवर भाजपाच फास…
तरुणांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी समर्थक अस्वस्थ झाले आहेत. अस्वस्थ राष्ट्रवादीतील एका बड्या माजी नगरसेवकावर भाजपने जाळे बिछडले असून त्यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.