‘त्या’ एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार
महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका व्यक्तीवर अफवा पसरवत लोकांमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप आहे, पोलिसांनी दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. या व्हिडीओतून ट्रक चालकांना घाबरवत एक खोटी अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे ट्रक चालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांनी तपास केला असता, गुजरातमधील पंकज गिरी याने ही अफवा पसरवल्याचं उघड झालं. तो बडोद्यात वास्तव्यास आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या कार्यालयातून बेड्या ठोकल्या आहेत