कार्यकर्ते म्हणतात.. विधानसभा निवडणुकीत राहुल देसाई म्हणतील ते धोरण

गारगोटी (प्रतिनिधी):- राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुक राहुल देसाई यांनी कोणत्या पक्षातुन लढवायची व कोणत्या पक्षात प्रवेश करावयाचा याचे सर्वाधिकार देसाई यांना देण्याचा एकमुखी ठराव करून आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकीत माजी आमदार बजरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वाटचालीत देसाई यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा व राहूल देसाई म्हणतील ते धोरण असेल असा निर्णय राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.तर यावेळी भाजपाच्या पदाधिकारी यांनी सामुदायिक राजीनामे देण्याची घोषणा केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात पुढील दिशा ठरवण्यासाठी मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती.अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते तर गोकुळ दूध संघाचे माजी संचालक धैर्यशील देसाई, प्रकाश कुलकर्णी, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक धोंडीराम मगदुम प्रमुख उपस्थित होते.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई म्हणाले की, ज्या अपेक्षेने व कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला पण तेथे आपला भ्रमनिरास झाला .त्यामुळे आपण कार्यकर्ते हेच बळ मानून देसाई गटाच्या भविष्यातील वाटचालीकरिता आपण भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.कार्यकर्ताच्या हिताचा विचार करून वाटचाल करणार आहोत.
जेष्ठ नेते व पांडुरंग सहकार समुहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी म्हणाले की,भाजपा मध्ये आपल्या कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत होती. आमदारकीच्या काळात या मतदारसंघाला विकासाभिमुख करण्याकरिता व विकासाचा वारसा पुढे चालवण्यासाठी देसाई जो निर्णय घेतील त्यांचे स्वागतच असेल.
भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल तळकर म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक सत्तेचे ठिकाणी देसाई गटाचे कार्यकर्त्यांना संधी देण्यात देसाई यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने प्रत्येक सत्तेत आपल्याला वाटा मिळाला आहे मतदारसंघालाही अश्या युवा नेतृत्वाची गरज आहे आता देसाई जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आपण सक्षमपणे राहुया.
गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर म्हणाले की, राहुल देसाई जो निर्णय घेतील त्यांला आपण सर्वांनी बळ देवुया . राजकारणापेक्षा समाजकारण करणारे नेते म्हणून देसाई यांची ओळख असुन भविष्यात तो ज्यो काही निर्णय घेतील त्यांच्याशी स्वाभिमानी कार्यकर्ते प्रामाणिक रहातील.
भुदरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील म्हणाले, देसाई गटाला पुन्हा एकदा वैभवशाली दिवस राहुलदादांच्यामुळे येणार असुन सगळ्यांनी ताकदीने कामाला लागुया.
तालुका संघाचे माजी संचालक सदाशिव देवर्डेकर म्हणाले की , आपली ताकद संपूर्ण मतदारसंघात वाढली असुन येणाऱ्या सर्व निवडणुकीत दाखवून देवूया.यावेळी गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई, एम एम कांबळे बी एस पाटील, शिवाजी वारके शशिकांत फराकटे , प्रताप मेंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
तर या कार्यक्रमास बिद्री साखर कारखान्याच्या संचालिका सौ अरुंधती संदीप पाटील , किरण कुरडे सुरेश खोत ,शिवराज देसाई, नामदेव पाटील, (अर्जुनवाडा) रंगराव पाटील (शेळेवाडी),एस एल पाटील चंद्रे , भीमराव रेपे (सरवडे)साईराज कावनेकर (पनोरी) संजय देसाई (मडीलगे)माजी सभापती गोपाळ कांबळे, एम डी पाटील,अर्जुन पाटील,
शांताराम तॏंदकर (कासारवाडा), ,अर्जुन पाटील ,सुनील देसाई दगडू राऊळ ,राजू दबडे सुदेश सापळे,
रवींद्र पारकर (सरपंच आकुर्डे), बाबासाहेब जाधव भोई,सिराज देसाई,सागर भाट, संतोष चव्हाण, शुभम मगदुम ,संजय देसाई, एच डी देसाई , दिग्वीजय कुलकर्णी ,रंगराव बावस्कर यांचेसह भुदरगड राधानगरी, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित होते, स्वागत व प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी केले तर आभार नारायण पाटील यांनी मानले.

Activists say.. The policy that Rahul Desai will say in assembly elections

About The Author