मिरजेतील श्रीमंत महागणपती मंडळाकडून पर्यावरणपूरक २१ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापणा

प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा देत फायबर पॅालिमरपासून मूर्तीची निर्मिती

मिरज (प्रतिनिधी)

येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक परिसरातील श्रीमंत महागणपती मंडळाचे यंदाचे १७ वे वर्ष असून पर्यावरणपूरक २१ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून न बनवता सदर मूर्ती फायबर पॅालिमरपासून बनवण्यात आली आहे. गणेशोत्सवमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हा आमचा उद्देश असून मंडळाकडून अनेक सामाजिक राबवत असल्याची माहिती ही मंडळाचे संस्थापक अभिजीत कातरकी, अमित पाटील व खजिनदार सागर चौगुले यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, २००८ साली मंडळाची स्थापना झाली असून आजअखेर मंडळाने गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले आहे. पारंपारिक व पर्यावरणपुरक उत्सव करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. यंदा बनवलेली मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा देत फायबर पॅालिमरपासून बनवण्यात आली आहे. ही मुर्ती पुढील २५ वर्ष आहे जतन करुन ठेवली जाईल. त्यामुळे विसर्जन आणि त्यानंतर होणारे पाणी प्रदूषण रोखले जाणार आहे. पुढील काळात मूर्तीच्या रकमेचा योग्य विनियोग करीत समाजपयोगी उपक्रमांना अग्रक्रम दिला जाणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सव डॉल्बीमुक्त असून पारंपारिक ढोलताशांच्या गजरात उत्सव साजरा होईल. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासह राबवल्या जाणाऱ्या अन्य उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले आहे. महिलांना देखील समान न्याय मिळावा, मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेता यावा यासाठी दरवर्षी उपाध्यक्ष पद महिलांना दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अध्यक्ष-अजिंक्य आमटे, उपाध्यक्ष-ऐश्वर्या धुमाळ, खजिनदार-मनोज चव्हाण, अभिजीत धुमाळ तसेच सागर चौगुले, सुनील दिवानमल, गणेश चौंडीकर,  संकेत परचुरे , विनय जोशी ,सोमनाथ मालगावे, मच्छिंद्र वाघमारे, विकास चव्हाण, शितल दस्तानी, पराग पिड्डे, अनुप अहुजा, प्रतीक पवार,अमोल सरवदे, प्रमोद माने, विनोद माने, व्यंकटेश ताडे,अक्षय चौगुले, रोहित ओमासे, रोनक ठक्कर, अनुज शहा,फाल्गुन ठक्कर, बबूल चूग, डॉ. जीवन माळी, डॉ. हर्षल कुलकर्णी, डॉ. सचिन कोठावळे, डॉ. राहुल चौगुले, प्रतीक सूर्यवंशी, सौरभ दुर्गाडे व इतर सदस्य उपस्थित होते.

रेझिन फायबरपासून बनवलेल्या मूर्तींचे फायदे-

  1. टिकाऊपणा: माती किंवा प्लास्टरपासून बनवलेल्या पारंपरिक मूर्तींच्या तुलनेत रेझिन फायबरच्या मूर्ती अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. या मूर्तींना तडा जात नाही किंवा सहजपणे तुटत नाही, ज्यामुळे त्या दीर्घकाळ टिकून राहतात.
  2. पाण्याचा प्रतिकार : या मूर्ती पाणी आणि आर्द्रतेला प्रतिरोधक असतात, ज्यामुळे ते बाहेरच्या वापरासाठी किंवा दमट वातावरणात फायदेशीर ठरतात.
  3. हलकेपणा : रेझिन फायबरच्या मूर्ती तुलनेने हलक्या असतात, ज्यामुळे त्यांची वाहतूक आणि हाताळणी सुलभ होते. 
  4. सुलभ देखभाल: त्यांना कमीतकमी देखभाल आवश्यक आहे आणि मऊ कापडाने सहजपणे साफ करता येते. 
  5. आर्थिक दृष्ट्या लाभदायी : इतर साहित्यापासून बनवलेल्या मूर्तींपेक्षा रेझिन फायबरच्या मूर्ती तयार करण्यासाठी कमी खर्चिक असतात. 
  6. अष्टपैलुत्व: रेझिन फायबर क्लिष्ट डिझाईन्स आणि आकारांमध्ये तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे मूर्तीच्या डिझाइनमध्ये अधिक अष्टपैलुत्व प्राप्त होते. 
  7. हवामानाचा प्रतिकार: या मूर्ती जास्त अथवा कमी तापमानासह दूषित हवामानाचा देखील सामना करू शकतात. 

About The Author