विश्रामबागला शुक्रवारी आशा होमिओपॅथीचे भव्य शिबिर

सांधे व हाडांच्या आजारांसंबंधीच्या या शिबिराचा लाभ घेण्याचे डॉ. शैली शर्मा-भोसलेंकडून आवाहन

मिरज (प्रतिनिधी)

मिरज येथील प्रसिद्ध असलेल्या आशा होमिओपॅथीतर्फे सांध्यांच्या व हाडांच्या आजारांसाठी विश्रामबाग येथे आज शुक्रवार (दि.२०) सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सांधे व हाडांच्या आजारांसंबंधी या शिबिराचा रुग्ण व नागरिकानी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शैली शर्मा भोसले यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी माहिती दिली की, होमिओपॅथी उपचार पद्धती ही आजाराच्या मुळाशी जाऊन उपचार करणारी आधुनिक व नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या शिबिरात होमिओपॅथीद्वारे संधिवात, चिकन गुनिया, गाऊट, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, शरीराची संपूर्ण सांधेदुखी, हाडांची झीज, सायटिका आधी विकारांबाबत चिकित्सा व उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात सवलतीच्या दरामध्ये औषधोपचार केले जाणार आहेत. विश्रामबाग येथील आशा होमिओपॅथीमध्ये पै प्रकाश हॉटेल जवळ सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. वरीलपैकी कोणत्याही अस्थिरोगासंबंधी तक्रारी असतील, व्याधी असतील तर त्यांनी शिबिरात संपर्क करावा, असेही आवाहन डॉ. शैली शर्मा भोसले यांनी केले आहे.

About The Author