भाजपच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जाणीव जागर
कोल्हापूर (प्रतिनिधी):- बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निंदनीय घटनेचे राजकारण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शनिवारी ऐतिहासिक दसरा चौक याठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ जाणीव जागर करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दसरा चौक या ठिकाणी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, बदलापूर या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी असून आम्ही समाज म्हणून, माणूस म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. अशा घटनांचा मुद्दा आमच्यासाठी कधीही राजकीय उद्देशाचा नव्हता. समाजात अशा घटना घडू नये आपल्या महिला भगिनी सुरक्षित रहाव्यात म्हणून आम्ही हा जाणीव जागर करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्दे नाहीत याउलट महायुती सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण या हेतूने अनेक योजना राबवल्या जात आहेत. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महिलांच्या सुरक्षेची प्रत्येकाची जबाबदारी म्हणून महिला सुरक्षेची शपथ उपस्थितांना दिली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहूल चिकोडे, डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, अतुल चव्हाण, अमर साठे, राजसिंह शेळके, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, महेश यादव,अभिजित शिंदे, महेश यादव, गिरीष साळोखे, संतोष माळी, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, किसनराव खोत, अश्विनी गोपूगडे, तेजस्विनी पार्टे, प्रणोती पाटील, श्वेता गायकवाड,सुजाता पाटील, छाया ननवरे, शामल भाकरे, अमेय भालकर, वेदार्थ राजवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थिती होते.