भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मिरजेत साधला कार्यकर्त्यांशी संवाद
आगामी २ महिने मनापासून काम करण्याचे तावडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मिरज (प्रतिनिधी)
केंद्रात व राज्यात भाजप व मित्रपक्षांनी अनेक समाजोपयोगी योजना यशस्वीपणे राबविल्या असून त्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य जनतेला, महिलांना झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील अशा लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना सदर योजनेचा लाभ वेळच्या वेळी मिळतो ना, काही अडचणी नाहीत ना, या योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनमानात काय फरक पडला याची आत्मीयतेने चौकशी करण्याचे काम केले पाहिजे. त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना या योजना निश्चितपणे सुरु राहतील असा विश्वास दिला पाहिजे, तरच अशा लाभार्थ्यांचा भाजप व मित्रपक्षांच्या बद्दल विश्वास वाढेल व त्याचे परिणाम निश्चितपणे निवडणुकीच्या मतदानातून दिसून येतील असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोदजी तावडे यांनी मिरज येथे भाजप नेतेच,पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
मिरजेतील पटवर्धन हॉल येथे भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित “संवाद मेळावा” कार्यक्रमात गुरुवारी सकाळी तावडे यांनी मार्गदर्शन केले व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याची नेमकी भूमिका कोणती, काय करणे गरजेचे आहे, काय टाळणे गरजेचे आहे याबाबत मौलिक सल्ला दिला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मा. तावडेजी यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.
या संवाद कार्यक्रमास भाजप मिरज विधानसभेचे आमदार पालकमंत्री ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपजिल्हा महामंत्री व मिरज विधानसभा संयोजक मोहन वाटवे, मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे, भाजप मिरज ग्रामीण प्रभारी धनंजय कुलकर्णी, युवा नेते सुशांत दादा खाडे, पूर्व मंडळ अध्यक्ष सुमेध ठाणेदार, पश्चिम मंडळ अध्यक्ष विक्रम पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, माजी महापौर सौ.संगीता खोत, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, मिरज पश्चिम प्रभारी विशाल पवार, महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष अनघा कुलकर्णी व पश्चिम अध्यक्ष अनिता हारगे, अभिजित लाड, रुपाली गाडवे, रुपाली देसाई, लतिका शेगाने, शशिकांत वाघमोडे, मिरज तालुका अध्यक्ष दिनकर भोसले, चैतन्य भोकरे, सागर वडगावे, अजिंक्य हंबर, अनिल रसाळ, शोभा तोडकर, प्राची फाटक, महेश फोंडे, राजेंद्र नातू, मनीष देशपांडे, महेश क्षीरसागर, असगर शारिकमसलात, उमेश हारगे, जयगोंडा कोरे, अनिल हारगे, ईश्वर जनवाडे, राहुल कुर्ले , किरण बंडगर, उमेश पाटील, गजेंद्र कुल्लोळी, संदीप सलगर आयांच्यासह भाजप पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने व भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जिल्हा महामंत्री मोहन वाटवे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी समारोप करताना विनोद तावडे यांचे आभार मानले.