महानगरपालिकेची आमसभा बोलावून नागरी समस्या सोडवा : प्रणव पाटील
सांगली (प्रतिनिधी)
महापालिकेवर सध्या प्रशासक राज सुरु असून गेल्या एक वर्षांपासून जनतेचे प्रश्न आणि नागरी समस्या जैसे थे आहेत. ते सोडविण्यासाठी आयुक्तानी आमसभा बोलावून जनतेचे प्रश्न आणि नागरी समश्या जाणून घेऊन त्या सोडवाव्यात अशी मागणी मा. आमदार प्रा. शरद पाटील विचारमंच च्या वतीने आयुक्तांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
महापालिकेचे नगरसेवक निवृत्त झाल्यामुळे गेली वर्षभर महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार सुरु आहे.त्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु असून प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्यामुळे आयुक्तानी जनतेची आमसभा बोलावून जनतेची गाऱ्हानी जाणून घेऊन ते तात्काळ सोडवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे सांगून लवकरच याबाबत नगरविकास विभागाच्या सचिव असीमकुमार गुप्ता यांची भेट घेणार असल्याचे यावेळी प्रणव पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा. सलीम सय्यद, प्रा. सन्मती सूर्यवंशी, प्रा. पंकज पाटील, यांच्यासह सर्वश्री जमीर शरीकमसलत, रोहित पाटील, प्रमोद कोरे,सागर कोरवी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.