शियेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,खुनाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च
शिये (प्रतिनिधी):- शिये (ता. करवीर) येथे श्रीराम नगर मध्ये गुरुवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री हनुमान नगर येथील ग्रामस्थांनी गावात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. गावातील जाधव गल्ली हनुमान मंदिर, गाडवे गल्ली या परिसरातून ग्रामस्थांनी मेणबत्ती हातामध्ये घेऊन गावातून निषेध फेरी काढली.ही रॅली हनुमान मंदिर समोर आल्यानंतर त्या ठिकाणी पीडित मुलगीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी वनिता मोरे यांनी शासनाने यामध्ये लक्ष घालून संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली तसेच वारंवार महिलांचे अत्याचार होऊ नये यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली.येथील दुर्दैवी घटनेतील संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा अशी मागणी हनुमान नगरच्या नारी ग्रुपच्या वतीने केली.