नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी पकडला सोळा किलो गांजा, पुण्यातील धक्कादायक प्रकार
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी सोळा किलो गांजा पकडून दिला. पानटपरीत किंवा अन्य दुकानांमध्ये ‘बडीशेप’ची किरकोळ विक्री होते, त्याप्रमाणे संबंधित शैक्षणिक संस्थेबाहेर गांजाची विक्री करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी या प्रकरणी एकाला पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.