मिरजेत बुधवारी भाजप-जनसुराज्यची दहीहंडी ; मोहन वनखंडे व समित कदम यांची माहिती

ऑलम्पिकवीर कुसाळे, अभिनेत्री डेझी शाह, अमृता खानविलकर सह अनेक कलाकारांची उपस्थिती

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेत बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्ष व जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीची मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी होणार असल्याची माहिती भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली.

माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत ऑलिपिक स्पर्धेमधील यशस्वी खेळाडूच्या सत्कारासह प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आल्याचेही त्यांनी सांगितले. मिरज आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मिरज शासकीय रुग्णालयासमोरील मिरज पंढरपूर रोडवरील रुद्र पशुपती मैदान येथे बुधवारी सायं.४ वाजल्यापासून दहीहंडी खेळाचा थरार सुरू होणार आहे. ऑलम्पिकमधील कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेत वनखंडे व कदम यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी माजी नगरसेवक महादेव कुरणे, डॉ. पंकज म्हेत्रे, सागर वनखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या दहीहंडी कार्यक्रमास सिने अभिनेत्री डेझी शाह व अमृता खानविलकर उपस्थित राहणार आहेत. त्यासह निवेदिका प्रियंका राऊत, शिवानी नाईक, रोहित परशुराम हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. सुमित एंटरटेनमेंटच्या स्पेक्टॅकलर डान्स ग्रुपचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

About The Author