चंदुरमध्ये कोट्यवधींची विकासकामे पूर्णत्वास आम. प्रकाश आवाडे

चंदुर (प्रतिनिधी)
माजी पं.स.सभापती महेश पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चंदुर गावात कोट्यवधींची विकास कामे पूर्णत्वास आली आहेत.छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी महेश अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते. या सभागृहासाठी 52 लाखाचा निधी दिला असून आणखी निधी देण्याचीही तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. ते चंदुर येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मा. जि. प. सदस्य डॉ. राहुल आवाडे,माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार आवाडे म्हणाले,चंदुरमध्ये जल जीवन योजना,विविध रस्ते,गटारी आदी तब्बल 60 ते ७0 कोटींची विकासकामे पूर्णत्वात आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली असून माझ्याप्रमाणे तुमचाही आशीर्वाद त्यांना मिळून दे अशी अपेक्षाही आम. आवाडे यांनी व्यक्त केली. मराठा व इतर समाज यांना विविध कामासाठी बहुउपयोगी असणाऱ्या या सभागृहासाठी 25-15 योजनेअंतर्गत ५२ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे स्वागत माजी उपसरपंच संदीप कांबळे यांनी केले.
यावेळी महेश पाटील बोलताना म्हणाले की गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजासाठी आवश्यक असलेल्या सभागृहाचा प्रश्न अखेर आमदार आवाडे यांनी मार्गी लावला एवढेच नव्हे तर त्यांनी वस्त्रोद्योगासाठी वीज सवलत ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करणारा शासन निर्णय घेऊन वचनपूर्ती केली.त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. यानिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राहुल आवाडे , जगोंड पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी माजी प. स. सभापती शालन पाटील, माजी पं. स. सभापती शुभांगी पाटील, ग्रा.पं. सदस्य मारुती पुजारी,संजय जिंदे,भाऊसो रेंदाळे, फिरोज शेख, बाबासाहेब मंगसुळे, ग्रा.पं. सदस्या वैशाली पाटील ,ललिता पुजारी,रुपाली पुजारी, योगिता हळदे, रोहिणी घोरपडे, ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे,सुरेश चव्हाण,विजय बोरवडे,उत्तम मिठारी, शिवाजी गवंडी, विष्णु भोसले, रविंद्र संपकाळ, राहुल माने,राजू ढेरे,संजय निकम,भरत खडसरे,सुनिल भोसले,शहाजी भोसले
यांचेसह मराठा समाजातील मान्यवर,ग्रामविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन,संचालक, ग्रामस्थ, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार धुळा पुजारी यांनी मानले.

About The Author