विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कै. बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराने सन्मान होणार
सांगली (प्रतिनिधी)
ल. वि. तथा बाळासाहेब गलगले फाऊंडेशन कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना कैलासवासी बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती गलगले यांचे नातू आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी दिली.
कैलासवासी बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 2 सप्टेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर सांगली येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये मनोहर सारडा यांना धर्मरक्षक पुरस्कार, विर कुदळे यांना नगरसेवा पुरस्कार, प्रकाश कांबळे यांना वृत्तपत्र सेवा पुरस्कार, रावसाहेब पाटील यांना सहकार सेवा पुरस्कार, मानिकताई परांजपे यांना क्रीडा सेवा पुरस्कार, अनंतकुमार साळुंखे यांना शाहिरी सेवा पुरस्कार आणि सतिश दुधाळ यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे,आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. तरी बाळासाहेब गलगले मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ही फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केले आहे. यावेळी अरूण गडचे, श्रीकांत शिंदे, रविंद्र वादवणे शाहीर नामदेव अलासे, सुभाष खराडे आदी उपस्थित होते.