महापालिकेच्या फेरीवाला समितीवर जनसेवा भाजीपाला संघटनेचे वर्चस्व

सांगली (प्रतिनिधी)

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या महानगरपालिका पथविक्रेता समितीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा फळे भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघटनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संघटनेचे कैश अहमद मुनीर अलगुर, बेबी दावल शेख, महेश मोतुगडे हे सर्वाधिक तिघे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर चौथी जागा मिरज येथील सादिक बागवान यांनी पटकावली. यापूर्वी दोन जागांसाठी शंभूराज काटकर यांच्या जनसेवा आणि भाजप माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या मातोश्री संघटनेची युती होऊन जनसेवेच्या लताताई दुधाळ व मातोश्रीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला. या निवडणुकीत भाजप नेते पृथ्वीराज आणि गौतम पवार पुरस्कृत पॅनेलचे लता कांबळे, असलम शेख आणि सुरेश टेंगले यांचा दारुण पराभव झाला. जनसेवेचे अमित परीट हे एकमेव उमेदवार 50 मतांनी पराभूत झाले.

या यशाबद्दल बोलताना शंभूराज काटकर यांनी गेल्या सात आठ वर्षांमध्ये भाजीपाला विकत त्यांची भक्कम संघटना उभा करण्यासाठी घेतलेल्या कटकाचे भाजीपाला विक्रेत्यांनी चीज करून दाखवले. प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेत ठेवलेल्या काही त्रुटींमुळे मते बाद होण्याचे प्रमाण वाढले असून भाजीपाला विक्रेत्यांना पदवीधरांच्या पद्धतीने मतदान करायला न लावता चिन्ह वाटप करून मतदान झाले असते तर हा विजय अजून दणदणीत झाला असता. यापुढे अशा त्रुटी टाळण्याबरोबरच फेरीवाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने व्यापार करण्यासाठी कोणताही भेद न करता सर्वांना चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम जनसेवेचे पदाधिकारी करतील असा विश्वास व्यक्त केला. सांगली शनिवार बाजार मध्ये विजयी उमेदवारांचा जल्लोषी सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष इलियास पखाली, शंकर चांदकवठे, प्रशांत शिकलगार आबा मारगुडे रमजान मुल्ला दत्तात्रय भोसले कृष्णा जाधव सादिक शेख शंकर फोंडे, इर्शाद पठाण समीर पठाण प्रभाकर गोरे बाबू जोंग दादू लोखंडे पिंटू चव्हाण आरिफ गडकरी मनोज शिंदे चंद्रकांत चिरोटे अजय गडदे सुखदेव गळवे जहांगीर महात अनिल शेटे राहुल हातगिने बबलू गायकवाड संजय कट्टे संदीप ढोले यांच्यासह संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author