डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण रखडल्याने कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

आरपीआय अशोक कांबळे गटाचा आंदोलन करण्याचा इशारा

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचे काम गेली कित्येक महिने रखडले आहे. या सुशोभीकरणासाठी 50 लाखाचा निधी मंजूर असून याबाबत वर्क ऑर्डर काढून काम सुरू केलं आहे, मात्र संबंधित कंत्राटदार काम पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे. सुशोभीकरणाचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेस मिरज येथील प्रभाग क्रमांक सात मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयाच्या निधी मंजूर आहे. सदर कामाची वर्क ऑर्डर ही 11 जुलै 2023 रोजी निघाली असून सदर कामाचे कंत्राट कंत्राटदार बी. बी. गुंजाटे यांना मिळाले आहे. गुंजाटे यांनी सब कॉन्ट्रॅक्टर सरफराज कच्ची यांना दिले आहे. सदर कामे कंत्राटदाराने ६ महिन्यात पूर्ण करण्याचे होते. मात्र एक वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा इथलं सुशोभीकरनाचे काम जाणून-बुजून रखडवून ठेवण्यात आल आहे. शिवाय 50 लाख रुपयाच्या दर्जाचे काम या ठिकाणी होताना दिसत नाही, त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे.

सुशोभीकरणाचे काम करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यास देण्यात आल आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे नेते अभिजीत आठवले सर, भास्कर जगताप, डॉ.रविकुमार गवई, अविनाश जकाते सर, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, दिपक शिंदे, राम कांबळे, शब्बीर चिवेलकर, संजय काबळे, सागर दरबारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

About The Author