बोलवाड जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कडून दसरा भेट
१५ व्या वित्त आयोगातून लांबून येणाऱ्या मुलांना सायकल वाटप
मिरज (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळा बोलवाड मधील सहा मुलं व सहा मुली यांना ग्रामपंचायत बोलवाड सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून लांबून चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे यांचे सह ग्रामपंचायत सदस्य भाऊसो नरगचे, शोएब बारगीर, पुष्पावती पाटील ,वंदना खोत, मुख्याध्यापक अमोल माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली या एक प्रकारे दसरा भेट असल्याचे मुख्याध्यापक अमोल माने यांनी सांगितले .
जिल्हा परिषद शाळा बोलवाड हे दुसऱ्या टप्प्यातील मॉडेल स्कूल असून एमपीएसपी कडून नुकतेच संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून मिळाले आहे.शाळेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी ग्रामपंचायत कडून लवकरच पैसे भरण्यात येतील व येणाऱ्या दिवसांमध्ये जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधून मिळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रयत्न करू असा विश्वास सरपंच निगार शेख व उपसरपंच सचिन दादा कांबळे यांनी उपस्थितांना दिला. विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरून सर्व ग्रामपंचायतींना आदेश प्राप्त झाले असल्याने जिल्हा परिषद शाळा बोलवाड मध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असेही उपसरपंच सचिन दादा कांबळे यांनी सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगातून बोलवाड गावातील तीनही अंगणवाड्यांना ग्रामपंचायत मार्फत गॅस कनेक्शन त्यामध्ये एक शेगडी व दोन सिलेंडर टाकी तसेच विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार शिजवण्यासाठी भांडी व मिक्सर देण्यात आला. यावेळी सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य भाऊसो नरगच्चे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पावती पाटील, वंदना खोत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण सरोदे, मुख्याध्यापक अमोल माने शिक्षक परसराम सलगरे, संतोष ढोले, सविता डांगे ,शुभांगी पाटील, सतीश गस्ते, अंगणवाडी सेविका लता कांबळे,संध्या पाटील, मदतनीस ज्योती कांबळे, करिष्मा पुजारी यांच्यासह पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.