महायुतीचे उमेदवार सुरेश खाडेंना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा जाहीर पाठींबा
मिरज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे राज्य मंत्री अजितराव घोरपडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सुरेश खाडेंना जाहीर पाठिंबा दिला.
याप्रसंगी सुरेश खाडे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी व सर्वसामान्य घटकासाठी काम करीत असताना ते सदैव सोबत होते मात्र आज जाहीर पाठिंबा दिल्याने नक्कीच मोठे पाठबळ मिळाले आहे. मिरज विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. त्यांची अभ्यासू साथ या निवडणुकीत यश मिळवून देण्यात बहुमोल ठरेल असा विश्वास ही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. यावेळी जनसुराज्यचे मा. समितदादा कदम, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटक मा. मकरंदभाऊ देशपांडे, माजी नगरसेवक मा. पांडुरंग कोरे, मा. राजवर्धन घोरपडे उपस्थित होते.