श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शनाची सोय
आज पर्यंत 600 महिलांनी घेतले देवदर्शन ; पालकमंत्र्यांचे महिलांनी मानले आभार
मिरज (प्रतिनिधी)
पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे आणि सौ. सुमनताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देव दर्शनाची सोय करण्यात आली आहे. आता पर्यंत 10 बसेस मधून सहाशे महिलांनी देव दर्शन घेतले आहे. शेकडो महिलांसाठी दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मिरजेतील महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे, सौ.सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्यासहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.