ना. डॉ. सुरेश खाडेंतर्फे श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शन
महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद ; पालकमंत्र्यांचे महिलांनी मानले आभार
मिरज (प्रतिनिधी)
पालकमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे आणि सौ. सुमनताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देव दर्शनाची सोय करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पाच बसेस मधून महिलांना दर्शनासाठी पाठवण्यात आले. शेकडो महिलांना दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिरजेतील महिलांनी या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, सौ.सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर, अनघा कुलकर्णी, अनिता हारगे यांच्यासहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.