मिरजेत रविवारी मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिर
ब्राम्हणपुरीतील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील ब्राम्हणपुरी परिसरातील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, मिरज व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबिर मल्हार अपार्टमेंट पार्किंग, डॉ. शिवानंद कुलकर्णी दवाखानाच्या मागे, दत्त मंदिर रोड, ब्राह्मणपुरी, मिरज येथे होणार आहे.
नेत्र चिकित्सा शिबिरात कॉम्प्युटराईज्ड नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू, काच बिंदू डोळ्यांचा तिरळेपणा, डोळे लाल होणे, डोळ्याला खाज येणे, अस्पष्ट दृश्य दिसणे, बुब्बुळांचा रंग बदलणे याची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. तर दंत चिकित्सा शिबिरात दात दुखणे, किडणे, दातांचा रंग बदलणे, दात वेडेवाकडे असणे किंवा गॅप असणे, तोंडातून दुर्गधी येणे व अन्य सर्व दंत रोग याची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत.
वरील समस्या असणाऱ्या नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शैलेंद्र (आण्णा) कुपवाडे – 7276080811, यश पाटील – 9075115666, आदित्य देसाई – 7020109394, इंद्रजित रजपूत 8200954011, अथर्व वैद्य – 9730237177 यांचेशी गरजूनी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.