मिरजेत राईस अँड शाईन फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून गरबा नाईट उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
राईस अँड शाईन फिटनेस स्टुडिओ मिरजच्या माध्यमातून वर्षभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. कलाक्षेत्रामध्ये डांस झुंबा आरोग्य या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोग राईस अँड शाईन स्टुडिओ करून दिले जातात. यावर्षी राईस अँड शाईन फिटनेस स्टुडिओला दोन वर्षे पूर्ण होत असून दुसऱ्या वर्धापन दिना निमित्ताने गरबा नाईटचा इव्हेंट आयोजित केला होता. हा इव्हेंट मल्लिकार्जुन देवालय मिरज येथे साजरा करण्यात आला.
यावेळी मिरज सांगली भागातील लहान मुलांपासून ते तरुण-तरुणाईसोबत ज्येष्ठ मंडळी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी भारतीय संस्कृतीतील एक कला म्हणून ओळखले जाणाऱ्या गरबा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर महिला मुली मुलं व जोड्यांचा रॅम्प वॉक देखील घेण्यात आला. सर्व सहभागी तरुण-तरुणी या वेळेला पारंपारिक वेशात आले होते. मल्लिकार्जुन देवाच्या पटांगणात जवळजवळ तीन-चारशे तरुण-तरुणी एकत्र येऊन नवरात्रीतील गरबा नृत्याचा आस्वाद घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समित कदम, मोहन वनखंडे, मितेश पवार, सागर वनखंडे, राजेश गुजर, सुभाष चिकोडीकर, गौरव चिपलकट्टी सराफ व मिरजेतील सर्व कलाप्रेमी मंडळी हजर होते. कार्यक्रमाचे सर्व आयोजन राईस अँड शाईन डान्स व फिटनेस स्टुडिओ कडून वृषभ केशव, अवनिश यादवाडे, श्रुती चनगौंडर, रोहित शिंदे, वैष्णवी चनगौंडर, अनिकेत भोये, विनायक चौगुले, विकास लोखंडे, विनोद खाडे, बालेश चनगौंडर व सर्व सहकारी मित्र यांनी केले. यावेळी संचालिका डॉ. रीनाज पटेल जर्मनी मधून ऑनलाईन सहभागी होत्या. यावर्षी प्रमाणे प्रत्येक वर्षी असा इव्हेंट घेण्याचा संकल्प राईस अँड शाईन स्टुडिओचे संचालक वृषभ केशव यांनी व्यक्त केला आहे.