पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट

मृताच्या कुटुंबियांना चार लाखाची मदत तात्काळ जाहीर

       पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.

   पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती  घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.

         पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे आदी तसेच अधिकारी उपस्थित होते.

About The Author