स्व. गुलाबराव पाटील यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त केंब्रीज स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)

स्व. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि फेडरल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकेत सरिता पाटील म्हणाल्या, स्व.गुलाबराव पाटील साहेब हे स्पष्ट वक्ते आणि निर्भही होते. युक्तिवाद मांडण्याची त्यांची खास शैली होती या गुणांमुळेच त्यांनी एक प्रतिष्ठित वकील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यसभेत मांडले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य जनता शेतकरी आणि समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या भल्यासाठी वाहून घेतले. यामुळे श्रीमती इंदिरा गांधीं यांनी त्यांची राज्यसभेवर निवड केली.

तंत्रज्ञानाच्या अगोदरचे व नंतरचे जीवन, मतदानाचे महत्त्व, संवेदनशीलता, वेळेचे महत्व असे या वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सीबीएसई च्या उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर तसेच शिक्षिका फातिमा चौधरी यांनी परीक्षण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम कनवाडे, द्वितीय क्रमांक समृद्धी साळुंखे, तृतीय क्रमांक जान्हवी सपकाळ, व उत्तेजनार्थ सृष्टी साळुंखे आणि श्रिया गाडवे यांनी यश संपादन केले. या कार्यक्रमास संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील कॅम्पस को-कॉडीनेटर डॉ. सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता पाटील व आभार दत्तात्रय पाटील यांनी मानले.

About The Author