मिरज युथ फाऊंडेशन व याग इंडस्ट्रीयल इस्टेटतर्फे आयोजित आरोग्य शिबिर व बांधकाम कामगार नोंदणी उत्साहात
उद्योजक विनायक यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले आयोजन
मिरज (प्रतिनिधी)
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरज युथ फाऊंडेशन व याग इंडस्ट्रीयल इस्टेटतर्फे आयोजित आरोग्य शिबिर व बांधकाम कामगार नोंदणी शिबीर उत्साहात पार पडले. मिरजेतील जीपीएम कॉलेज रोडवर आयोजित या शिबिराचे उद्योजक विनायक यादव यांच्या पुढाकाराने उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आले. १५ ऑगस्ट दिनी गणे मळा येथील याग इंडस्ट्रीयल इस्टेट ७८ वा स्वातंत्र्य दिन ही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी उद्योजक विनायक यादव म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. मिरज व कुपवाड एमआयडीसी क्षेत्रात अनेक बहुसंख्य परराज्यातील कामगार आहेत. आपल्या आरोग्याची ही तमा न बाळगता हे अहोरात्र काम करतात. त्यांच्या सेवेसाठी सदरचे आरोग्य शिबीर नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
आगामी काळात मिरज युथ फाऊंडेशन व याग इंडस्ट्रीयल इस्टेटतर्फे आणखी समाजोपयोगी कामे तत्परतेने करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बहुसंख्य बांधकाम कामगारांची नोंदणी ही करण्यात आली.