जास्त वेळ बसून राहण्यामुळे आरोग्यावर होत आहेत दुष्परिणाम?
सध्या या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम करणे आणि सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणे, हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अपुरी झोप, पोषक आहार न घेणे, जंक फूड खायला खूप आवडणे, सतत तणाव जाणवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायामाची सवय नसणे इत्यादी गोष्टींमुळे आपण निरोगी जीवन जगू शकत नाही. पण, नियमित २० मिनिटे चालण्यामुळे तुम्हाला फरक जाणवू शकतो. या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी ‘होलिस्टिक हेल्थ’ तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली.